Posts

*सिंदखेड राजा नगरपरिषद निवडणुकीची छाननी प्रक्रिया पडली पार, नगरसेवक पदाचे 5 उमेदवार अपात्र तर एकूण 8 नामनिर्देशन अर्ज अपात्र करण्यात आले* मा.राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून दिनांक 17 नोव्हेंबर 2025 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होती, काल दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी नगरसेवक पदासाठी एकूण 106 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 12 अर्ज प्राप्त झाले होते. आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी प्रक्रिया मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सुरु केली , काल नगरसेवक पदासाठी एकूण 87 उमेदवारांनी मिळून हे 106 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी आजच्या पूर्ण छाननी प्रक्रियेअंती एकूण नगरसेवक पदासाठी आलेल्या 87 उमेदवारांच्या एकूण 106 अर्जापैकी एकूण 5 उमेदवारांना अपात्र तसेच एकूण 8 अर्ज हे अस्विकृत करण्यात आले आहेत. छाननी अंती हे अपात्र उमेदवार तसेच अस्विकृत अर्जानंतर सध्या 82 पात्र उमेदवारांचे एकूण 98 नामनिर्देशन अर्ज स्विकृत करण्यात आले आहेत. तसेच नगराध्यक्ष पदासाठी एकूण 8 उमेदवारांनी 12 नामनिर्देशन अर्ज केले होते, त्यापैकी फक्त एका उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज अस्विकृत करण्यात आला आहे, सध्या एकूण 8 उमेदवारांचे 11 नामनिर्देशन अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत.नगराध्यक्ष पदाचा एक अर्ज अस्विकृत करण्यात आला. म्हस्के दिपाली योगेश ( प्रभाग क्रमांक 1 अ पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), सोनल विजय तायडे( प्रभाग क्रमांक 3 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), समीना बेगम खान ( प्रभाग क्रमांक 4 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), खुरपे मंगेश विश्वंभर आप्पा ( प्रभाग क्रमांक 4 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), बारवकर दिनेश रामदास (9 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे) हे पाच उमेदवार नामनिर्देशन प्रक्रियेतून अपात्र ठरले आहेत. तसेच संगीता कोरडे (प्रभाग क्रमांक 7 ब ), पठाण वाजीब मुजीब खान ( प्रभाग क्रमांक 8 ब ), साक्षी संजय वायकोस ( प्रभाग क्रमांक 8 ब ) या तीन उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरला असल्यामुळे यांची उमेदवारी कायम ठेवून यांचे अपक्ष अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत. आजच्या या छाननी प्रक्रियेसाठी मा. निवडणूक निरीक्षक जी.पी. साबळे साहेब,मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे, मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आशिष बोबडे , मा. तहसीलदार अजित दिवटे, मा. गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर,मा. नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, नायब तहसीलदार नितीन बढे, मा. गटशिक्षणाधिकारी स्वप्नील निकम, महिला बाल विकास अधिकारी जीवन राठोड, प्रसार माध्यम नोडल अधिकारी प्रकाश शिंदे तसेच इतर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Image
            शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र सिंदखेड राजा नगरपरिषद निवडणुकीची छाननी प्रक्रिया पडली पार, नगरसेवक पदाचे 5 उमेदवार अपात्र तर एकूण 8 नामनिर्देशन अर्ज अपात्र करण्यात आले*  मा.राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद सार्वत्रिक  निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 10  नोव्हेंबर 2025 पासून दिनांक 17 नोव्हेंबर 2025 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होती, काल दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी नगरसेवक पदासाठी एकूण 106 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 12 अर्ज प्राप्त झाले होते.  आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी प्रक्रिया मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सुरु केली , काल नगरसेवक पदासाठी एकूण 87 उमेदवारांनी मिळून हे 106 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी  आजच्या पूर्ण छाननी प्रक्रियेअंती एकूण नगरसेवक पदासाठी आलेल्या 87 उमेदवारांच्या एकूण 106 अर्जापै...

नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मा. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची सिंदखेडराजाला भेट, निवडणुकिची तयारी पाहून केले समाधान व्यक्त*

Image
* नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मा. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची सिंदखेडराजाला भेट, निवडणुकिची तयारी पाहून केले समाधान व्यक्त*  मा.राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद सार्वत्रिक  निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 10  नोव्हेंबर 2025 पासून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे, आज दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी  मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. डॉ. किरण पाटील साहेब यांनी नगर परिषद सिंदखेडराजाला भेट दिली. आजच्या बैठकीमध्ये मा. डॉ.पाटील साहेबांनी अधिकाऱ्यांना नामनिर्देशन अर्जाबाबत मार्गदर्शन करून नगर परिषद निवडणुक योग्य प्रकारे पार पाडावी असे सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मध्ये सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रकारे काम केले असेच काम आत्ता नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये सर्वानी करावयाचे आहे असे मा. पाटील साहेबांनी सांगितले. डॉ. किरण पाटील साहेब यांनी आजच्या पाहणी दौऱ्यामध्ये  सिंदखेड राजा...

सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणुकीला वेग मा.निवडणूक निरीक्षक सिंदखेडराजामध्ये दाखल, निवडणूक तयारीची पाहणी करून केले समाधान व्यक्त*

Image
* सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणुकीला वेग मा.निवडणूक निरीक्षक सिंदखेडराजामध्ये दाखल, निवडणूक तयारीची पाहणी करून केले समाधान व्यक्त*  महाराष्ट्र नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 च्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी जोरदार सुरु असताना मा. श्री. जी. पी. साबळे यांची सध्या सुरु असलेल्या सिंदखेडराजा नगर परिषद 2025 करिता निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून त्यानिमित्ताने आज मा. निवडणूक निरीक्षक श्री. साबळे यांचे सिंदखेड राजा येथे आगमन झाले असून मा.निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मा. निवडणूक निरीक्षक श्री. साबळे यांचे स्वागत केले. सध्या निवडणुकीचे उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची आणि प्रशासनाची लगबग सुरु आहे, श्री. साबळे यांनी नामनिर्देशन अर्ज भरताना काही अडचणी येत आहेत का याची पाहणी केली सोबतच मतदान याद्या अद्यावत केलेल्या आहेत की नाही, तसेच निवडनूक अर्ज प्रक्रियेनंतरची छाननी संदर्भात काही महत्वाच्या सूचना मा.निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना दिल्या. निवडणुकीच्या अनुषंगाने श्री. साबळे यांनी नगर परिषद सिंदखेडराजा येथील मतदान स...

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

Image
  राजेश इंगळे यांची दुसरबीड सर्कल मध्ये उमेदवारी निश्चित कुंबेफळचा सम्राट जनसेवक.  राजेश इंगळे! तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने  कुंबेफळ नागपूर–मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत वसलेलं कुंबेफळ हे गाव गेल्या काही वर्षांत विकासाच्या नव्या वाटेवर प्रवास करत आहे. या परिवर्तनामागे जर एखादं नाव प्रामुख्याने घ्यायचं झालं, तर ते म्हणजे — राजेश इंगळे! साधा, प्रामाणिक पण विलक्षण दृष्टीकोन असलेला हा तरुण आज गावाच्या आणि परिसराच्या प्रत्येक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.  *ग्रामविकासात क्रांती* राजेश इंगळे यांनी सरपंचपदाची जबाबदारी घेतली आणि काही महिन्यांतच ग्रामविकासाच्या नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवल्या. प्रशासनातील अनुभव, अधिकारांशी संवाद आणि निधी खेचून आणण्याची क्षमता — या तिन्ही गोष्टींनी कुंबेफळला नवा वेग दिला. पाणीपुरवठा, रस्ते, शाळा, ग्रामपंचायत कार्यालयाचा विकास, आणि गावातील सामाजिक कार्यक्रमांना चालना — या सर्व क्षेत्रांत इंगळे यांनी लाखो रुपयांचा निधी आणून गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला.  * मनसेचा विश्वासू सैनिक * मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्त...

सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरीचे सरपंच राजेश इंगळे कार्यसम्राट जनसेवक तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, एकमेव सरपंच याची दुसर बीड सर्कल मध्ये उमेदवारी निश्चित

Image
सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरीचे सरपंच राजेश इंगळे कार्यसम्राट जनसेवक तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, एकमेव सरपंच याची दुसर बीड सर्कल मध्ये उमेदवारी निश्चित  आज माननीय राजसाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत सहकारी,, महाराष्ट्रात ओळखणारे मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरीचे सरपंच राजेश इंगळे कार्यसम्राट जनसेवक तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, एकमेव सरपंच बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अनेक पदे भूषून माननीय राज साहेब यांच्यासोबत आत्तापर्यंत एकनिष्ठ राहिलेले राजेश भाऊ इंगळे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 2012 ते 2017 दुसर बीड सर्कलमध्ये दोनदा प्रभाव झाला तरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दुसर बीड सर्कलमध्ये राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पुन्हा गेल्या आठ दिवसापासून दुसरी सर्कलच्या विकासासाठी कामाला  लागली आहे गेल्या अनेक वर्षापासून राजेश इंगळे सर्व सामान्य जनतेचे काम आत्तापर्यंत करत राहिले त्यातून महाविकास आघाडीच्या युती माध्यमातून मनसे जागा सुटू शकते हे मात्र नक्की कारण राज साहेब ठाकरे यांच्या आदे...

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

Image
किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत  जळगाव नगरीचे तरुण तडफदार स्वाभिमानी  उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट

Image
समाधान भालेराव जिल्हा प्रतिनिधी आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरीचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार शेतकरी मायबाप आणि माझ्या भगिनी यांना रोजगार मिळावा म्हणून सविस्तर चर्चा तसेच कुंबेफळ नगरीचा विविध विकासकामे थोड्या दिवसात पूर्ण होईल अशी शब्द मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार तोतारामजी कायदे साहेब योगायोग यांच्या उपस्थिती लाभली तसेच मी सरपंच या नात्याने साहेबांचा सत्कार करताना उपस्थित सर्व माझे सहकारी साहेबांनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा

आज दिंनाक १५/६/२०२३ रोजी, प्रा आ केंद्र आडगाव राजा अंतर्गत मौजे चिंचोली येथे मा. जिल्हा

Image
आज दिंनाक १५/६/२०२३ रोजी, प्रा आ केंद्र आडगाव राजा अंतर्गत मौजे चिंचोली येथे मा. जिल्हा हिवताप अधिकारी श्री.चव्हाण सर व मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. साळवे सर आणि मा. वै. अ. डॉ ताठे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हिवताप जनजागृती बाबत विविध कार्यक्रम राबविण्यात आले   सोबतच मच्छराचा प्रादुर्भाव होऊन मच्छराच्या चाव्या पासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना काय कराव्यात या विषयावर  ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आठवड्यात एक दिवस कोरडा पाळण्याचे आवाहन केले                                              समाधान भालेराव बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शिवनेरी टुडे

पंडित नेहरू विद्यालय , कला वविज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मलकापूर पांग्रा ता.सिंदखेड राजा जि.बुलडाणा बारावी उत्तीर्ण

Image
पंडित नेहरू विद्यालय , कला वविज्ञान  कनिष्ठ महाविद्यालय मलकापूर पांग्रा  ता.सिंदखेड राजा जि.बुलडाणा बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. सायन्स शाखा निकाल 99.07%  ( एकुण विद्यार्थी संख्या=108पैकी 107 उत्तीर्ण 01परिक्षेस गैरहजर) व  आर्ट्स शाखा निकाल 79.16%   (एकूण विद्यार्थी संख्या = 24 पैकी 19 उत्तीर्ण 05 परिक्षेसगैरहजर )निकाल लागला आहे.  सायन्स शाखा  (1) प्रथम क्रमांक. ओम शंकर उगलमुगले   86%  (2) द्वितीय क्रमांक कु. वृषाली सुभाष बोंद्रे 82.67%व   (3) तृतीय क्रमांक प्रज्वल दिलीप नागरे 80.86% आणि   आर्टस शाखा  ( 1) प्रथम क्रमांक भारत आत्माराम थोरवे 68.83%  (2)द्वितीय क्रमांक कु.पल्लवी  सोमीनाथ गाडेकर 67.83% (3)तृतीय क्रमांक कु. वर्षा भिकाजी कायंदे 67.50 % पास झालेल्या  सर्व विद्यार्थ्यांचे . प्राचार्य श्रीआर.एस.मोरेसर व शिक्षक वृंद यांच्याकडून हार्दिक  हार्दिक अभिनंद

गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा

Image
गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अशोक डोईफोडे उमरत महाराष्ट्र असिस्टंट फोटोग्राफी किनगाव राजा नरसिंह फोटो स्टुडिओ उमरद अशोक डोईफोडे उमरद  फोटो व्हिडिओ मिक्सिंग डिझाईन बर्थडे ऑर्डर लग्ना ऑर्डर व इतर सर्व ऑर्डर स्वीकारले जातील कलर प्रिंट अर्जंट पासपोर्ट फोटो कलर फोटो फ्रेम आधार कार्ड अपडेट पॅन कार्ड अपडेट मोबाईल प्रिंट कलर प्रिंट साधी प्रिंट संपर्क अशोक डोईफोडे उमरद मोबाईल नंबर 98 23 30 12 20

गृह मंगल प्रवेश आणि धम्मदान🔹*

Image
*🔹 गृह मंगल प्रवेश आणि धम्मदान🔹* *==============================* *दि 09 मार्च 2023,बुलडाणा.* *आजीवन शपथपत्राचे 600 ₹ धम्मदान .* *___________________________________* दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया जिल्हा बुलडाणा प्रवक्ता निरंजन जाधव सर यांनी *आयु भीमराव गवई साहेब* तार कॉलनी सुंदरखेड बुलडाणा येथे यांच्या नवीन घराचा *गृह मंगल प्रवेश* कार्यक्रम विधिवत पार पाडला.आणि *संस्थेच्या 10 उद्दिष्टेवर* प्रकाश टाकला. *_____________________________________* दि बुद्धिस्ट  सोसायटी ऑफ इंडियाचे आजीवन शपथपत्राचे *आयु साहेबराव पारवे सर ग्रॅज्युएट टीचर बुलडाणा यांनी माहेवार 100 ₹ प्रमाणे पुढील  6 महिन्याचे 600 ₹ धम्मदान दिले.*    या साठी निरंजन जाधव सर आणि आयु कमलाकर काकडे सर,मा. उच्चश्रेणी मुख्याध्यापक यांनी सहकार्य केले. *योगदानाबद्दल सन्मा. पारवे परिवारास मंगल कामना.* *(बँक स्क्रीनशॉट सोबत दिला आहे)* *संपर्क:9623237428* *============================== *

डो. खंडाळा येथे साक्षगंध कार्यक्रम,उमरा येथे संस्थेच्या भूमिकेबद्दल मार्गदर्शन आणि धम्मदान* *=============================*

Image
*🔹 डो. खंडाळा येथे साक्षगंध कार्यक्रम,उमरा येथे संस्थेच्या भूमिकेबद्दल मार्गदर्शन आणि धम्मदान* *=============================* *दि 5 , 6 मार्च 2023,बुलडाणा.* *आजीवन शपथपत्राचे 1000 ₹ धम्मदान.* *___________________________________* दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष *आद. राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब, विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या* स्वप्नातील समाज उभा करण्यासाठी आपले तारुण्य पणाला लावणारे,तरुण पिढीला नव्या उमेदीचे बळ देऊन धम्म वलयामध्ये समाविष्ठ करून त्यांची अनेक पटीने जबाबदारी वाढवणारे प्रचंड स्वाभिमानी पोलादी नेतृत्व.     *आद. साहेबांच्या* मार्गदर्शनाखाली कार्यरत कार्यकर्त्यांपैकी निरंजन जाधव सर,*आयु रामभाऊ हिवाळे मा. उपाध्यक्ष,आयु कमलाकर काकडे सर मा. उच्चश्रेणी मुख्याध्यापक, आयु साहेबराव पारवे सर ग्रॅज्युएट टीचर* जि. बुलडाणा हे संस्थेच्या हितासाठी धम्मबांधवांच्या डोअर टू डोअर भेटी घेऊन संस्थेची भूमिका विषद करत आहेत.     डोंगर खंडाळा ता+जि.बुलडाणा येथे नियोजित दारक *आयु रणजित समाधान बोर्डे व दारिका शिवानी गजानन वानखडे* यांचा साक्षगंध क...

🔹एका उपासकाचा स्मृतिदिन,नंतर एक मंगल परिणय विधी आणि धम्म बांधवांचे TBSI ला धम्मदान🔹*

Image
* 🔹 एका उपासकाचा स्मृतिदिन,नंतर एक मंगल परिणय विधी आणि धम्म बांधवांचे TBSI ला धम्मदान 🔹* * ======≠=======================* *दि 02 मार्च 2023,बुलडाणा.* *आजीवन शपथपत्राचे 1200 ₹ जमा.* *____________________________________*     दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष *आद. राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब*,विकासात्मक परिघाबाहेर जीवन जगणाऱ्या समाजाला आर्थिक सक्षम करण्यासाठी नव्या उमेदीचे बळ देणारे प्रचंड स्वाभिमानी नेतृत्व.        * आद.राजरत्न आंबेडकर साहेबांच्या* नव्या पर्वाच्य मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते संस्थेच्या हितासाठी, वाढीसाठी कार्य करत असल्यामुळे समाजाच्या सर्व क्षेत्रामधून धम्म संस्कृतीतील विधि संस्कारासाठी संस्थेच्या कार्यकर्त्यांना सन्मानाने पाचारण केले जात आहे.      *स्मृतिशेष विजय एकनाथ पडघान* यांचे दि 28 फेब्रुवारी 2023 ला हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या 61 व्या वर्षी दुःखद निधन झाले. आज त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम निरंजन जाधव सर यांनी विधिवत पार पाडला. *____________________________________*     ...

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जनता विद्यालय सावखेड तेजन या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन.

Image
*  * राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जनता विद्यालय सावखेड तेजन या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन.*  भारतरत्न सी.व्ही. रमण यांच्या विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज  जनता विद्यालय, सावखेड तेजन, तालुका सिंदखेडराजा. या ठिकाणी शाळेच्या वतीने विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन  करण्यात आले होते.  या विज्ञान प्रदर्शनीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. दिलीप काकडे सर, तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. धुमाळ सर ,श्री.लंबे सर होते. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन श्री. दिलीप काकडे सर यांच्या हस्ते करण्यात आले .ग्रामीण भागातील शाळा असूनही अतिशय उत्कृष्ट वैज्ञानिक उपकरणाचा सहभाग विज्ञान प्रदर्शनी मध्ये होता. या ठिकाणी शाळेचे विज्ञान शिक्षक श्री. पडूळकर सर, विज्ञान शिक्षिका सौ. राठोड मॅडम तसेच शाळेचे शिक्षक श्री . शिंपने सर श्री. जायभाये सर, श्री. कोळी सर, सौ. सरोदे मॅडम तसेच शाळेचे विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.  यावेळी श्री. काकडे सर यांनी विज्ञानाचे महत्त्व व विज्ञानातील प्रगती त...

आजीवन शपथपत्राचे 500 ₹ संस्थेच्या खात्यात जमा🔹* *==========================* *दि 13 फेब्रुवारी 2023,बुलडाणा.*

Image
*🔹 आजीवन शपथपत्राचे 500 ₹ संस्थेच्या खात्यात जमा🔹 * *==========================* *दि 13 फेब्रुवारी 2023,बुलडाणा.*      दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाचे कार्यकर्ते निरंजन जाधव सर,*आयु कमलाकर काकडे सर मा.उच्च श्रेणी मुख्याध्यापक, आयु साहेबराव पारवे सर मा.ग्रॅज्युएट टीचर* हे संस्थेच्या हितासाठी, वाढीसाठी संस्थेची 10 उद्दिष्टे,एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे आणि जिल्ह्यत येऊ घातलेल्या बुद्धिस्ट बँकसाठी शेअर सदस्य वाढवण्यासाठी डोअर टू डोअर जाऊन कनव्हीस करत असल्याने उपासक तयार होत आहेत. *आयु राजू  जाधव सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांनी आजीवन शपथपत्राचे माहेवार 100 ₹ प्रमाणे पुढील 5 महिन्याचे 500 ₹ योगदान दिले. आणि येणाऱ्या बुद्धिस्ट बँकेचे शेअर घेण्यास सुद्धा तयार आहेत.*      *सन्मा.जाधव परिवाराने आद.राजरत्न आंबेडकर साहेबांचे* हात बळकट करण्यासाठी जे योगदान दिले त्या बद्दल *जिल्हा कार्यकारीणीच्या मंगल कामना.* *(बँक स्क्रीनशॉट सोबत दिलेला आहे)* *संपर्क 9623237428* *============================*

गृहप्रवेश विधिवत पार पाडला आणि आजीवन शपथपत्र धम्मदान🔹*

Image
*🔹 गृहप्रवेश विधिवत पार पाडला आणि आजीवन शपथपत्र धम्मदान🔹 * *==============================* * दि 14 फेब्रुवारी 2023,बुलडाणा .*       दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाचा कार्यकर्ता निरंजन जाधव सर यांनी आदर्श कॉलनी बुलडाणा येथे *प्रा.महेंद्र अशोक डोंगरे* यांनी स्वकष्टाने,परिस्थितीशी सामना करून बांधलेल्या घराचा गृहप्रवेश कार्यक्रम *सन्मा.भंते स्वरांदजी महाथेरो* यांनी विधिवत पार पाडलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन केले. *____________________________________*      दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष *आद. राजरत्न आंबेडकर साहेबांनी* आर्थिक समर्थ समाज करण्यासाठीची घेतलेली भूमिका डोअर टू डोअर संस्थेचा कार्यकर्ता या नात्याने निरंजन जाधव सर विषद करत असल्याने धम्मबांधव आजीवन शपथपत्र भरून बुद्धिस्ट जिल्ह्यात येऊ घातलेल्या बँकेचे शेअर  घेण्यास तयार आहेत.    * आयु गोधाबाई जनार्दन डोंगरदिवे वृंदावन कॉलनी सुंदरखेड बुलडाणा यांनी माहेवार 100 ₹ आजीवन शपथपत्र भरून दिले.*      *100 ₹* संस्थेच्या खात्यात जमा करून दिलेल्या यो...

ही कीर्तन सेवा जळपिंपळगाव चे सुपुत्र व युवा उद्योजक, स्व वऱ्हाडी मिसळ चे संस्थापक श्री गजानन आंधळे यांनी घेतली होती

Image
ही कीर्तन सेवा  जळपिंपळगाव चे सुपुत्र व युवा उद्योजक, स्व वऱ्हाडी मिसळ चे संस्थापक  श्री गजानन आंधळे यांनी घेतली होती वंजारी समाजातील पहिल्या महिला मठाधिपती ,संत आई साहेब संस्थान महासांगवी ता पाटोदा जिल्हा येथील मठाधिपती ,आळंदी येथून संप्रदाय मध्ये MA करून समाज सुधारणेचा वसा व वारसा चालवणाऱ्या ह. भ.प.  *आई साहेब राधाताई सानप* यांची कीर्तन सेवा आज ओलांडेश्वर संस्थान  जळपिंपळगाव बु  तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा येथील हरिनाम सप्ताह मध्ये पार पडली. यावेळी आईसाहेबांनी समाजाविषयी आणि चालू घडामोडी वर सांगितलेलं कीर्तन

जिवन विकास विद्यालय दुसरबीड चे माॕडेल राज्यस्तरावर.... दि २ फेब्रुवारी ला झालेल्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत जिवन विकास विकास विद्यालय दुसरबीड

Image
जिवन विकास विद्यालय दुसरबीड चे माॕडेल राज्यस्तरावर.... दि २ फेब्रुवारी ला झालेल्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनीत जिवन विकास विकास विद्यालय दुसरबीड चा विद्यार्थी आरविंद ताठे वर्ग ८ वा या विद्यार्थाचे झटका मशिन हे माॕडल जिल्ह्यातुन व्दितीय क्रमांवर आले असुन असुन महाराष्ट्र राज्य स्तरावर होणाऱ्या विज्ञान प्रदर्शनीसाठी निवडल्या गेले आहे या वेळी त्याला प्रमाणपत्र व ट्राॕफी विद्यालयाचे प्राचार्य श्री गणेश व्ही.भांगेसर यांच्या हस्ते व पि.डी.गायके विज्ञान शिक्षक डी.पी.काकडे डी.जी.राजे एम बी पवार  जी.ओ.देशमुख कवाडे यांच्या हस्ते देण्यात आले.या पुर्वी या माॕडेल ला तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्रात झाला होता .या विद्यार्थी चे लोकशिक्षण संस्थेचे आध्यक्ष मुकूंदरावजी देशमुख व  राजे गणेशरावजाधव सचिव व सर्व संस्थेच्या पदाधीकारीनी कौतुक केले.या कार्यक्रमाला शिक्षणउपसंचालक पटवे साहेब  शिक्षणाधिकारी (माध्य)मूकुंदसाहेब उपस्थित होते तर जिवन विद्यालयामधे विद्यार्थांना प्रयोग निर्मीती साठी शाळास्तरावर प्रदर्शन आयोजीत केले जाते  या साठी एम सी व्ही सी चे सर्व प्राध्यापक वृंद व सर्व विज्ञ...

श्री.शिवाजी विद्यालय पिंपळगाव बु।। च्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड......

Image
श्री.शिवाजी विद्यालय पिंपळगाव बु।। च्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड... ...              शालेय शिक्षण विभाग आणि विज्ञान संघटना बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन न.प.शिवाजी हायस्कुल दे.राजा या ठिकाणी दि.17 व 18 जाने.2023 रोजी करण्यात आले होते.त्या प्रदर्शनामध्ये आमच्या विद्यालयातील  ऊपकरणाचा वर्ग 6 ते 8 च्या गटातून द्वितीय क्रमांक आला हे ऊपकरण भागवत लक्ष्मण सरोदे ( वर्ग 8 वा) याने  बनविले आहे.तसेच प्रश्रमंजूषा स्पर्धेमध्येही 6 ते 8 च्या गटातून प्रथम क्रमांक  गोपाल ज्ञानेश्वर शिंदे (वर्ग 8 वा)  वक्तृत्व स्पर्धेमध्येही  9 ते 12 च्या गटातून प्रथम  क्रमाक कु.वैष्णवी नामदेव डिघोळे (वर्ग 10 वा) व निबंध स्पर्धेतही 9 ते 12 च्या गटातून प्रथम क्रमांक कु.शिवानी नामदेव दराडे ( वर्ग 9 वा ) या चार विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.त्याचे श्रेय या विद्यार्थ्यांचे पालक,विज्ञान शिक्षीका सौ.गुंडे मॅडम,विज्ञान शिक्षक श्री.संदिप मुंढे व ओम राजगुरू यांना देतात.या यशाच...

हेलिकॉप्टर द्वारे जिजाऊ मासाहेब जन्म स्थळावर झाली पुष्प वृष्टी

Image
मातृ तीर्थावर राजमाता जिजाऊंचा 425 वा जन्मोत्सव उत्साह   सिंदखेडराजा येथे अभिता कंपनीचे CO सुनील शेळके यांनी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सव निमित्त जिजाऊ जन्मस्थळावर हेलिकॉप्टर द्वारे फुलांच वर्षाव करताना दिसतात