*सिंदखेड राजा नगरपरिषद निवडणुकीची छाननी प्रक्रिया पडली पार, नगरसेवक पदाचे 5 उमेदवार अपात्र तर एकूण 8 नामनिर्देशन अर्ज अपात्र करण्यात आले* मा.राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून दिनांक 17 नोव्हेंबर 2025 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होती, काल दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी नगरसेवक पदासाठी एकूण 106 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 12 अर्ज प्राप्त झाले होते. आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी प्रक्रिया मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सुरु केली , काल नगरसेवक पदासाठी एकूण 87 उमेदवारांनी मिळून हे 106 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी आजच्या पूर्ण छाननी प्रक्रियेअंती एकूण नगरसेवक पदासाठी आलेल्या 87 उमेदवारांच्या एकूण 106 अर्जापैकी एकूण 5 उमेदवारांना अपात्र तसेच एकूण 8 अर्ज हे अस्विकृत करण्यात आले आहेत. छाननी अंती हे अपात्र उमेदवार तसेच अस्विकृत अर्जानंतर सध्या 82 पात्र उमेदवारांचे एकूण 98 नामनिर्देशन अर्ज स्विकृत करण्यात आले आहेत. तसेच नगराध्यक्ष पदासाठी एकूण 8 उमेदवारांनी 12 नामनिर्देशन अर्ज केले होते, त्यापैकी फक्त एका उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज अस्विकृत करण्यात आला आहे, सध्या एकूण 8 उमेदवारांचे 11 नामनिर्देशन अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत.नगराध्यक्ष पदाचा एक अर्ज अस्विकृत करण्यात आला. म्हस्के दिपाली योगेश ( प्रभाग क्रमांक 1 अ पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), सोनल विजय तायडे( प्रभाग क्रमांक 3 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), समीना बेगम खान ( प्रभाग क्रमांक 4 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), खुरपे मंगेश विश्वंभर आप्पा ( प्रभाग क्रमांक 4 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), बारवकर दिनेश रामदास (9 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे) हे पाच उमेदवार नामनिर्देशन प्रक्रियेतून अपात्र ठरले आहेत. तसेच संगीता कोरडे (प्रभाग क्रमांक 7 ब ), पठाण वाजीब मुजीब खान ( प्रभाग क्रमांक 8 ब ), साक्षी संजय वायकोस ( प्रभाग क्रमांक 8 ब ) या तीन उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरला असल्यामुळे यांची उमेदवारी कायम ठेवून यांचे अपक्ष अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत. आजच्या या छाननी प्रक्रियेसाठी मा. निवडणूक निरीक्षक जी.पी. साबळे साहेब,मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे, मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आशिष बोबडे , मा. तहसीलदार अजित दिवटे, मा. गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर,मा. नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, नायब तहसीलदार नितीन बढे, मा. गटशिक्षणाधिकारी स्वप्नील निकम, महिला बाल विकास अधिकारी जीवन राठोड, प्रसार माध्यम नोडल अधिकारी प्रकाश शिंदे तसेच इतर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

            शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र




सिंदखेड राजा नगरपरिषद निवडणुकीची छाननी प्रक्रिया पडली पार, नगरसेवक पदाचे 5 उमेदवार अपात्र तर एकूण 8 नामनिर्देशन अर्ज अपात्र करण्यात आले* 


मा.राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद सार्वत्रिक  निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 10  नोव्हेंबर 2025 पासून दिनांक 17 नोव्हेंबर 2025 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होती, काल दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी नगरसेवक पदासाठी एकूण 106 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 12 अर्ज प्राप्त झाले होते. 

आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी प्रक्रिया मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सुरु केली , काल नगरसेवक पदासाठी एकूण 87 उमेदवारांनी मिळून हे 106 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी  आजच्या पूर्ण छाननी प्रक्रियेअंती एकूण नगरसेवक पदासाठी आलेल्या 87 उमेदवारांच्या एकूण 106 अर्जापैकी एकूण  5 उमेदवारांना अपात्र तसेच एकूण 8 अर्ज हे अस्विकृत करण्यात आले आहेत.  छाननी अंती हे अपात्र उमेदवार तसेच अस्विकृत अर्जानंतर सध्या 82 पात्र उमेदवारांचे एकूण 98 नामनिर्देशन अर्ज स्विकृत करण्यात आले आहेत. 

तसेच नगराध्यक्ष पदासाठी एकूण 8 उमेदवारांनी 12 नामनिर्देशन अर्ज केले होते, त्यापैकी फक्त एका उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज अस्विकृत करण्यात आला आहे, सध्या एकूण 8 उमेदवारांचे 11 नामनिर्देशन अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत.नगराध्यक्ष पदाचा एक अर्ज अस्विकृत करण्यात आला.

म्हस्के दिपाली योगेश ( प्रभाग क्रमांक 1 अ पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), सोनल विजय तायडे( प्रभाग क्रमांक 3 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), समीना बेगम खान ( प्रभाग क्रमांक 4 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), खुरपे मंगेश विश्वंभर आप्पा ( प्रभाग क्रमांक 4 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), बारवकर दिनेश रामदास (9 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे) हे पाच उमेदवार नामनिर्देशन प्रक्रियेतून अपात्र ठरले आहेत. तसेच संगीता कोरडे (प्रभाग क्रमांक 7 ब ), पठाण वाजीब मुजीब खान ( प्रभाग क्रमांक 8 ब ), साक्षी संजय वायकोस ( प्रभाग क्रमांक 8 ब ) या तीन उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरला असल्यामुळे यांची उमेदवारी कायम ठेवून यांचे अपक्ष अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत.

आजच्या या छाननी प्रक्रियेसाठी मा. निवडणूक निरीक्षक जी.पी. साबळे साहेब,मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे, मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आशिष बोबडे , मा. तहसीलदार अजित दिवटे, मा. गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर,मा. नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, नायब तहसीलदार नितीन बढे, मा. गटशिक्षणाधिकारी स्वप्नील निकम, महिला बाल विकास अधिकारी जीवन राठोड, प्रसार माध्यम नोडल अधिकारी प्रकाश शिंदे तसेच इतर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट