राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जनता विद्यालय सावखेड तेजन या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन.
भारतरत्न सी.व्ही. रमण यांच्या विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल 28 फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आज जनता विद्यालय, सावखेड तेजन, तालुका सिंदखेडराजा. या ठिकाणी शाळेच्या वतीने विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.
या विज्ञान प्रदर्शनीच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. दिलीप काकडे सर, तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री. धुमाळ सर ,श्री.लंबे सर होते. विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन श्री. दिलीप काकडे सर यांच्या हस्ते करण्यात आले .ग्रामीण भागातील शाळा असूनही अतिशय उत्कृष्ट वैज्ञानिक उपकरणाचा सहभाग विज्ञान प्रदर्शनी मध्ये होता. या ठिकाणी शाळेचे विज्ञान शिक्षक श्री. पडूळकर सर, विज्ञान शिक्षिका सौ. राठोड मॅडम तसेच शाळेचे शिक्षक श्री
. शिंपने सर श्री. जायभाये सर, श्री. कोळी सर, सौ. सरोदे मॅडम तसेच शाळेचे विद्यार्थी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
यावेळी श्री. काकडे सर यांनी विज्ञानाचे महत्त्व व विज्ञानातील प्रगती तसेच विज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करण्याच्या संधी याविषयी मार्गदर्शन केले. श्री.धुमाळ सर,श्री. लंबे सर, श्री. पडूळकर सर यांनीही विज्ञानाचे महत्त्व समजून सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन श्री.शिंपने सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.जायभाये सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


Comments
Post a Comment