नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मा. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची सिंदखेडराजाला भेट, निवडणुकिची तयारी पाहून केले समाधान व्यक्त*
*नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मा. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची सिंदखेडराजाला भेट, निवडणुकिची तयारी पाहून केले समाधान व्यक्त*
मा.राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे, आज दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. डॉ. किरण पाटील साहेब यांनी नगर परिषद सिंदखेडराजाला भेट दिली.
आजच्या बैठकीमध्ये मा. डॉ.पाटील साहेबांनी अधिकाऱ्यांना नामनिर्देशन अर्जाबाबत मार्गदर्शन करून नगर परिषद निवडणुक योग्य प्रकारे पार पाडावी असे सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मध्ये सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रकारे काम केले असेच काम आत्ता नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये सर्वानी करावयाचे आहे असे मा. पाटील साहेबांनी सांगितले.
डॉ. किरण पाटील साहेब यांनी आजच्या पाहणी दौऱ्यामध्ये सिंदखेड राजा नगर परिषद निवडणुकीसाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. सदर भेटीमध्ये ईव्हीएम सुरक्षा कक्ष पाहण्यात आला, सुरक्षा कक्षामध्ये CCTV कॅमेरा व्यवस्था तसेच इतर सुरक्षाविषयक महत्वाच्या तयारीविषयी सूचना दिल्या. सोबतच डॉ. पाटील साहेबांनी मतमोजणी केंद्राची सुद्धा पाहणी केली, मतमोजणी केंद्रामधील व्यवस्था, सुरक्षा तसेच इतर सर्व पायाभूत सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केली. नगरपरिषद निवडणुकीसाठी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठीचे ठिकानाची सुद्धा पाहणी केली, प्रशिक्षण सर्व अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना देण्यात यावे याबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले. निवडणुकीच्या अनुषंगाने फिरते पथक, स्थिर पथक यांची संख्या सद्यस्थितीमध्ये पुरेशी आहे, महत्वाच्या ठिकाणी चेक पोस्ट सक्रिय आहे इत्यादी विषयाचा आढावा घेण्यात आला.
मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री.डॉ. किरण पाटील यांनी नगर परिषद सिंदखेडराजा येथील नामनिर्देशन अर्ज भरणाऱ्या कक्षाला भेट दिली, नामनिर्देशन अर्ज भरतेवेळी काही अडचणी येत आहेत का तसेच नामनिर्देशन प्रक्रियेसाठी काही महत्वाच्या सूचना निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना केल्या. तसेच प्रा. खडसे यांच्या निवडणूक तयारीबद्दल केलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.
आजच्या या पाहणीवेळी मा.उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे, मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आशिष बोबडे , मा. नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, नायब तहसीलदार नितीन बढे, पोलीस निरीक्षक आशिष इंगळे, प्रसार माध्यम नोडल अधिकारी प्रकाश शिंदे तसेच इतर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Comments
Post a Comment