सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणुकीला वेग मा.निवडणूक निरीक्षक सिंदखेडराजामध्ये दाखल, निवडणूक तयारीची पाहणी करून केले समाधान व्यक्त*


*सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणुकीला वेग मा.निवडणूक निरीक्षक सिंदखेडराजामध्ये दाखल, निवडणूक तयारीची पाहणी करून केले समाधान व्यक्त* 




महाराष्ट्र नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 च्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी जोरदार सुरु असताना मा. श्री. जी. पी. साबळे यांची सध्या सुरु असलेल्या सिंदखेडराजा नगर परिषद 2025 करिता निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून त्यानिमित्ताने आज मा. निवडणूक निरीक्षक श्री. साबळे यांचे सिंदखेड राजा येथे आगमन झाले असून मा.निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मा. निवडणूक निरीक्षक श्री. साबळे यांचे स्वागत केले.

सध्या निवडणुकीचे उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची आणि प्रशासनाची लगबग सुरु आहे, श्री. साबळे यांनी नामनिर्देशन अर्ज भरताना काही अडचणी येत आहेत का याची पाहणी केली सोबतच मतदान याद्या अद्यावत केलेल्या आहेत की नाही, तसेच निवडनूक अर्ज प्रक्रियेनंतरची छाननी संदर्भात काही महत्वाच्या सूचना मा.निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना दिल्या.

निवडणुकीच्या अनुषंगाने श्री. साबळे यांनी नगर परिषद सिंदखेडराजा येथील मतदान सुरक्षा कक्षाला (Strong Room) भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्वाच्या सूचना श्री. साबळे यांच्याकडून देण्यात आल्या. मतदान यंत्रे सुरक्षा कक्षाची पाहणी केली सोबतच CCTV च्या सुरक्षितेविषयी खातरजमा श्री. साबळे यांच्याकडून करण्यात आली.
  
निवडणुकीच्या अनुषंगाने फिरते पथक, स्थिर पथक यांची संख्या सद्यस्थितीमध्ये पुरेशी आहे, महत्वाच्या ठिकाणी चेक पोस्ट सक्रिय आहे  इत्यादी विषयाचा आढावा घेण्यात आला. आज श्री. साबळे यांनी सिंदखेडराजा नगर परिषद हद्दीतील मतदान केंद्राला भेट देऊन तेथील पायाभूत सुविधांची पाहणी केली, दिव्यांग मतदाराला मतदान केंद्रावर येताना कसलीही अडचण येणार नाही याबद्दल विशेष सूचना त्यानी दिल्या. तसेच मतदान केंद्रावरील कायदा सुव्यवस्था, संवेदनशील मतदारसंघ याबद्दल आढावा घेतला, सर्व आढावा घेतल्यानंतर मा. निवडणूक निरीक्षक श्री. साबळे यांनी समाधान व्यक्त केले.

आजच्या आढावा दौऱ्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, मुख्याधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.आशिष बोबडे, नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, नायब तहसीलदार नितीन बढे, प्रसार माध्यम नोडल अधिकारी प्रकाश शिंदे, हामीद काझी शहर अभियंता, ग्राम महसूल अधिकारी शिवानंद वाकदकर, राहुल देशमुख, उद्धव मांटे इत्यादी  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट