Posts

*सिंदखेड राजा नगरपरिषद निवडणुकीची छाननी प्रक्रिया पडली पार, नगरसेवक पदाचे 5 उमेदवार अपात्र तर एकूण 8 नामनिर्देशन अर्ज अपात्र करण्यात आले* मा.राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून दिनांक 17 नोव्हेंबर 2025 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होती, काल दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी नगरसेवक पदासाठी एकूण 106 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 12 अर्ज प्राप्त झाले होते. आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी प्रक्रिया मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सुरु केली , काल नगरसेवक पदासाठी एकूण 87 उमेदवारांनी मिळून हे 106 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी आजच्या पूर्ण छाननी प्रक्रियेअंती एकूण नगरसेवक पदासाठी आलेल्या 87 उमेदवारांच्या एकूण 106 अर्जापैकी एकूण 5 उमेदवारांना अपात्र तसेच एकूण 8 अर्ज हे अस्विकृत करण्यात आले आहेत. छाननी अंती हे अपात्र उमेदवार तसेच अस्विकृत अर्जानंतर सध्या 82 पात्र उमेदवारांचे एकूण 98 नामनिर्देशन अर्ज स्विकृत करण्यात आले आहेत. तसेच नगराध्यक्ष पदासाठी एकूण 8 उमेदवारांनी 12 नामनिर्देशन अर्ज केले होते, त्यापैकी फक्त एका उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज अस्विकृत करण्यात आला आहे, सध्या एकूण 8 उमेदवारांचे 11 नामनिर्देशन अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत.नगराध्यक्ष पदाचा एक अर्ज अस्विकृत करण्यात आला. म्हस्के दिपाली योगेश ( प्रभाग क्रमांक 1 अ पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), सोनल विजय तायडे( प्रभाग क्रमांक 3 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), समीना बेगम खान ( प्रभाग क्रमांक 4 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), खुरपे मंगेश विश्वंभर आप्पा ( प्रभाग क्रमांक 4 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे), बारवकर दिनेश रामदास (9 ब पक्षाचा एबी फॉर्म नसल्यामुळे) हे पाच उमेदवार नामनिर्देशन प्रक्रियेतून अपात्र ठरले आहेत. तसेच संगीता कोरडे (प्रभाग क्रमांक 7 ब ), पठाण वाजीब मुजीब खान ( प्रभाग क्रमांक 8 ब ), साक्षी संजय वायकोस ( प्रभाग क्रमांक 8 ब ) या तीन उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरला असल्यामुळे यांची उमेदवारी कायम ठेवून यांचे अपक्ष अर्ज स्वीकृत करण्यात आले आहेत. आजच्या या छाननी प्रक्रियेसाठी मा. निवडणूक निरीक्षक जी.पी. साबळे साहेब,मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे, मा. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आशिष बोबडे , मा. तहसीलदार अजित दिवटे, मा. गटविकास अधिकारी अजितकुमार बांगर,मा. नायब तहसीलदार डॉ. प्रवीणकुमार वराडे, नायब तहसीलदार नितीन बढे, मा. गटशिक्षणाधिकारी स्वप्नील निकम, महिला बाल विकास अधिकारी जीवन राठोड, प्रसार माध्यम नोडल अधिकारी प्रकाश शिंदे तसेच इतर सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Image
            शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र सिंदखेड राजा नगरपरिषद निवडणुकीची छाननी प्रक्रिया पडली पार, नगरसेवक पदाचे 5 उमेदवार अपात्र तर एकूण 8 नामनिर्देशन अर्ज अपात्र करण्यात आले*  मा.राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद सार्वत्रिक  निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 10  नोव्हेंबर 2025 पासून दिनांक 17 नोव्हेंबर 2025 उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होती, काल दिनांक 17 नोव्हेंबर 2025 रोजी नगरसेवक पदासाठी एकूण 106 अर्ज तर नगराध्यक्ष पदासाठी एकूण 12 अर्ज प्राप्त झाले होते.  आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी प्रक्रिया मा. निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सुरु केली , काल नगरसेवक पदासाठी एकूण 87 उमेदवारांनी मिळून हे 106 अर्ज दाखल केले होते, त्यापैकी  आजच्या पूर्ण छाननी प्रक्रियेअंती एकूण नगरसेवक पदासाठी आलेल्या 87 उमेदवारांच्या एकूण 106 अर्जापै...

नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मा. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची सिंदखेडराजाला भेट, निवडणुकिची तयारी पाहून केले समाधान व्यक्त*

Image
* नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मा. जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची सिंदखेडराजाला भेट, निवडणुकिची तयारी पाहून केले समाधान व्यक्त*  मा.राज्य निवडणूक आयोगाने नगर परिषद सार्वत्रिक  निवडणूक 2025 करिता निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला असून दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. सदर निवडणुकीच्या अनुषंगाने दिनांक 10  नोव्हेंबर 2025 पासून उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे, आज दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी  मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. डॉ. किरण पाटील साहेब यांनी नगर परिषद सिंदखेडराजाला भेट दिली. आजच्या बैठकीमध्ये मा. डॉ.पाटील साहेबांनी अधिकाऱ्यांना नामनिर्देशन अर्जाबाबत मार्गदर्शन करून नगर परिषद निवडणुक योग्य प्रकारे पार पाडावी असे सांगितले. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मध्ये सर्व अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी उत्तम प्रकारे काम केले असेच काम आत्ता नगर परिषद निवडणूक 2025 मध्ये सर्वानी करावयाचे आहे असे मा. पाटील साहेबांनी सांगितले. डॉ. किरण पाटील साहेब यांनी आजच्या पाहणी दौऱ्यामध्ये  सिंदखेड राजा...

सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणुकीला वेग मा.निवडणूक निरीक्षक सिंदखेडराजामध्ये दाखल, निवडणूक तयारीची पाहणी करून केले समाधान व्यक्त*

Image
* सिंदखेडराजा नगरपरिषद निवडणुकीला वेग मा.निवडणूक निरीक्षक सिंदखेडराजामध्ये दाखल, निवडणूक तयारीची पाहणी करून केले समाधान व्यक्त*  महाराष्ट्र नगर परिषद सार्वत्रिक निवडणुक 2025 च्या अनुषंगाने प्रशासनाची तयारी जोरदार सुरु असताना मा. श्री. जी. पी. साबळे यांची सध्या सुरु असलेल्या सिंदखेडराजा नगर परिषद 2025 करिता निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली असून त्यानिमित्ताने आज मा. निवडणूक निरीक्षक श्री. साबळे यांचे सिंदखेड राजा येथे आगमन झाले असून मा.निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी मा. निवडणूक निरीक्षक श्री. साबळे यांचे स्वागत केले. सध्या निवडणुकीचे उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची आणि प्रशासनाची लगबग सुरु आहे, श्री. साबळे यांनी नामनिर्देशन अर्ज भरताना काही अडचणी येत आहेत का याची पाहणी केली सोबतच मतदान याद्या अद्यावत केलेल्या आहेत की नाही, तसेच निवडनूक अर्ज प्रक्रियेनंतरची छाननी संदर्भात काही महत्वाच्या सूचना मा.निवडणूक निर्णय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना दिल्या. निवडणुकीच्या अनुषंगाने श्री. साबळे यांनी नगर परिषद सिंदखेडराजा येथील मतदान स...

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

Image
  राजेश इंगळे यांची दुसरबीड सर्कल मध्ये उमेदवारी निश्चित कुंबेफळचा सम्राट जनसेवक.  राजेश इंगळे! तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने  कुंबेफळ नागपूर–मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत वसलेलं कुंबेफळ हे गाव गेल्या काही वर्षांत विकासाच्या नव्या वाटेवर प्रवास करत आहे. या परिवर्तनामागे जर एखादं नाव प्रामुख्याने घ्यायचं झालं, तर ते म्हणजे — राजेश इंगळे! साधा, प्रामाणिक पण विलक्षण दृष्टीकोन असलेला हा तरुण आज गावाच्या आणि परिसराच्या प्रत्येक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.  *ग्रामविकासात क्रांती* राजेश इंगळे यांनी सरपंचपदाची जबाबदारी घेतली आणि काही महिन्यांतच ग्रामविकासाच्या नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवल्या. प्रशासनातील अनुभव, अधिकारांशी संवाद आणि निधी खेचून आणण्याची क्षमता — या तिन्ही गोष्टींनी कुंबेफळला नवा वेग दिला. पाणीपुरवठा, रस्ते, शाळा, ग्रामपंचायत कार्यालयाचा विकास, आणि गावातील सामाजिक कार्यक्रमांना चालना — या सर्व क्षेत्रांत इंगळे यांनी लाखो रुपयांचा निधी आणून गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला.  * मनसेचा विश्वासू सैनिक * मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्त...

सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरीचे सरपंच राजेश इंगळे कार्यसम्राट जनसेवक तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, एकमेव सरपंच याची दुसर बीड सर्कल मध्ये उमेदवारी निश्चित

Image
सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरीचे सरपंच राजेश इंगळे कार्यसम्राट जनसेवक तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, एकमेव सरपंच याची दुसर बीड सर्कल मध्ये उमेदवारी निश्चित  आज माननीय राजसाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत सहकारी,, महाराष्ट्रात ओळखणारे मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरीचे सरपंच राजेश इंगळे कार्यसम्राट जनसेवक तथा मनसे परिवहन महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, एकमेव सरपंच बुलढाणा जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अनेक पदे भूषून माननीय राज साहेब यांच्यासोबत आत्तापर्यंत एकनिष्ठ राहिलेले राजेश भाऊ इंगळे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 2012 ते 2017 दुसर बीड सर्कलमध्ये दोनदा प्रभाव झाला तरी तिसऱ्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे दुसर बीड सर्कलमध्ये राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पुन्हा गेल्या आठ दिवसापासून दुसरी सर्कलच्या विकासासाठी कामाला  लागली आहे गेल्या अनेक वर्षापासून राजेश इंगळे सर्व सामान्य जनतेचे काम आत्तापर्यंत करत राहिले त्यातून महाविकास आघाडीच्या युती माध्यमातून मनसे जागा सुटू शकते हे मात्र नक्की कारण राज साहेब ठाकरे यांच्या आदे...

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

Image
किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत  जळगाव नगरीचे तरुण तडफदार स्वाभिमानी  उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट

Image
समाधान भालेराव जिल्हा प्रतिनिधी आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट मातृतीर्थ सिंदखेडराजा तालुक्यातील कुंबेफळ नगरीचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार शेतकरी मायबाप आणि माझ्या भगिनी यांना रोजगार मिळावा म्हणून सविस्तर चर्चा तसेच कुंबेफळ नगरीचा विविध विकासकामे थोड्या दिवसात पूर्ण होईल अशी शब्द मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार तोतारामजी कायदे साहेब योगायोग यांच्या उपस्थिती लाभली तसेच मी सरपंच या नात्याने साहेबांचा सत्कार करताना उपस्थित सर्व माझे सहकारी साहेबांनी दिल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा