कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने
राजेश इंगळे यांची दुसरबीड सर्कल मध्ये उमेदवारी निश्चित कुंबेफळचा सम्राट जनसेवक. राजेश इंगळे! तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने कुंबेफळ नागपूर–मुंबई राष्ट्रीय महामार्गालगत वसलेलं कुंबेफळ हे गाव गेल्या काही वर्षांत विकासाच्या नव्या वाटेवर प्रवास करत आहे. या परिवर्तनामागे जर एखादं नाव प्रामुख्याने घ्यायचं झालं, तर ते म्हणजे — राजेश इंगळे! साधा, प्रामाणिक पण विलक्षण दृष्टीकोन असलेला हा तरुण आज गावाच्या आणि परिसराच्या प्रत्येक चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. *ग्रामविकासात क्रांती* राजेश इंगळे यांनी सरपंचपदाची जबाबदारी घेतली आणि काही महिन्यांतच ग्रामविकासाच्या नवनव्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवल्या. प्रशासनातील अनुभव, अधिकारांशी संवाद आणि निधी खेचून आणण्याची क्षमता — या तिन्ही गोष्टींनी कुंबेफळला नवा वेग दिला. पाणीपुरवठा, रस्ते, शाळा, ग्रामपंचायत कार्यालयाचा विकास, आणि गावातील सामाजिक कार्यक्रमांना चालना — या सर्व क्षेत्रांत इंगळे यांनी लाखो रुपयांचा निधी आणून गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला. * मनसेचा विश्वासू सैनिक * मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निकटवर्त...