श्री.शिवाजी विद्यालय पिंपळगाव बु।। च्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड......
श्री.शिवाजी विद्यालय पिंपळगाव बु।। च्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी निवड... ... शालेय शिक्षण विभाग आणि विज्ञान संघटना बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन न.प.शिवाजी हायस्कुल दे.राजा या ठिकाणी दि.17 व 18 जाने.2023 रोजी करण्यात आले होते.त्या प्रदर्शनामध्ये आमच्या विद्यालयातील ऊपकरणाचा वर्ग 6 ते 8 च्या गटातून द्वितीय क्रमांक आला हे ऊपकरण भागवत लक्ष्मण सरोदे ( वर्ग 8 वा) याने बनविले आहे.तसेच प्रश्रमंजूषा स्पर्धेमध्येही 6 ते 8 च्या गटातून प्रथम क्रमांक गोपाल ज्ञानेश्वर शिंदे (वर्ग 8 वा) वक्तृत्व स्पर्धेमध्येही 9 ते 12 च्या गटातून प्रथम क्रमाक कु.वैष्णवी नामदेव डिघोळे (वर्ग 10 वा) व निबंध स्पर्धेतही 9 ते 12 च्या गटातून प्रथम क्रमांक कु.शिवानी नामदेव दराडे ( वर्ग 9 वा ) या चार विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड झाली आहे.त्याचे श्रेय या विद्यार्थ्यांचे पालक,विज्ञान शिक्षीका सौ.गुंडे मॅडम,विज्ञान शिक्षक श्री.संदिप मुंढे व ओम राजगुरू यांना देतात.या यशाच...