दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाचा कार्यकर्ता होऊन धम्म कार्य घरा घरात पोहोचवा.

*दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाचा कार्यकर्ता होऊन धम्म कार्य घरा घरात पोहोचवा.*
          - निरंजन जाधव सर प्रवक्ता दि बु सो ऑफ इंडिया, जिल्हा बुलडाणा.
*===============================*
    दि 16 ऑक्टोबर 2022 ला *जेतवन बुद्धविहार* शिरवा ता मोताळा जि बुलडाणा येथे त्यागमूर्ती माता रमाई चरित्र ग्रंथ वाचन सामापन समारंभा प्रसंगी ते बोलत होते.

     या प्रसंगी आयु प्रशांत वागोदे साहेब जि अध्यक्ष वंचीत ब आघाडी, आयु युवराज भिडे ता अध्यक्ष वंचित ब आ मोताळा,आयु वानखडे सर जेष्ठ आंबेडकरी विचारवंत, उपस्थित होते.

    निरंजन जाधव पुढे म्हणाले की,दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडिया संस्थापक अध्यक्ष *विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर* ,राष्ट्रीय अध्यक्ष, आपले तारुण्य तमाम भारतीय बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यासाठी झटणारे जागतिक धम्म प्रचारक *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब,*. मातृसंस्थेच्या हितासाठी, वाढीसाठी व धम्म कार्य पुढे नेण्यासाठी संस्थेचा कार्यकर्ता म्हणून कार्य करण्याचे आव्हान त्यांनी उपस्थितांना केले.

        उपस्थित प्रमुख पाव्हन्यांनी समयोचित मनोगत व्यक्त केले. आयु भिडे साहेब यांनी  त्यागमूर्ती माता रमाईच्या त्यागाची विविध उदाहरणे देऊन उपस्थितांची मने जिंकली..आयु वागोदे.साहेब यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.

   जेतवन बुद्धविहारास आयु अनिल दाभाडे व आयु रंजनताई दाभाडे यांनी 
एक टेबल व वह्या व पेन संच दान दिले.

     या प्रसंगी परिसरातील धम्म उपासक बहुसंख्येने उपस्थित होते.

    प्रथम पावन प्रतिमांचे पूजन करून आद भंते गुणरत्न थेरो,स्वराणंदजी थेरो,बुद्धरत्न थेरो यांनी त्रिसरण पंचशील देऊन धम्म देसने सोबतच उपस्थितांना 22 प्रतिज्ञा देऊन धम्म दिक्षा दिली.

    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  विशाखा महिला मंडळ आणि भीम राजा  मित्र  मंडळ शिरवा यांनी विशेष परिश्रम घेतले.

    या विलोभनीय कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयु अमोल दाभाडे सर यांनी तर आभार आयु उमाळे साहेब यांनी मानले.

 सरणत्तय गाथे नंतर सामूहिक भोजनदान देण्यात आले.
*संपर्क:9623237428*
*===≠==≠===============≠======≠===*

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट