दि बुद्धिस्ट सो.ऑफ इंडिया शहर शाखेच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने आयु निरंजन जाधव सर यांचा भव्य सत्कार व नवीन सदस्य नोंदणी🔸
*🔸दि बुद्धिस्ट सो.ऑफ इंडिया शहर शाखेच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने आयु निरंजन जाधव सर यांचा भव्य सत्कार व नवीन सदस्य नोंदणी🔸*
*================================*
दि 10 जून 2022 ला, बुलडाणा शहराच्या *बौद्ध इतिहासात सर्वात प्रथम चार मजली बुद्धविहार उभारुन एक मिसाल उभी करणाऱ्या भीम नगर वॉर्ड नं 2 बुलडाणा येथिल उपासकांनी या पवित्र बुद्धविहारात शहर शाखा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने आयु निरंजन जाधव सर,प्रवक्ता जिल्हा बुलडाणा यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने *पुष्प गुच्छ व *एक पांढरा शुभ्र ड्रेस* देऊन सत्कार केला.
या प्रसंगी शहर शाखेचे पदाधिकारी *आयु लताताई खिल्लारे सचिव,आयु रत्नाताई इंगळे उपाध्यक्षा* ,शहर शाखा सदस्य तथा उपासक उपासिका बहुसंख्येनं उपस्थित होते.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या जागतिक पातळीवर नेतृत्वाखाली गतिमान झालेला धम्म प्रचार, प्रसार याने प्रभावित होऊन यथाशक्ती खारीच्या वाट्याप्रमाणे कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्या प्रातिनिधिक वरूपात काही उपासकांना संस्थेचे *धम्म दिक्षा प्रमाणपत्र* व *धम्म दिक्षा* देऊन सदस्य म्हणून *गौरविण्यात* आले.
प्रथम *तथागत भगवान गौतम बुद्ध व विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या* प्रतिरुपांचे दीप,धूप,पुष्प व प्रदीपाणे पूजन करून सामूहिक *त्रिशरण पंचशील* ग्रहण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेच्यासाठी *आयु लताताई खिल्लारे, आयु रत्नाताई इंगळे* यांनी परिश्रम घेतले.
*सरणत्तय गाथेने* कार्यक्रमाची सांगता करून उपस्थितांना *मिठाई* देण्यात आली.
*______________________________________*
*शब्दांकन:-* निरंजन जाधव सर,प्रवक्ता दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, जिल्हा बुलडाणा,*9623237428*
*____________________________________*
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र मुख्य संपादक विलासाळे मुंबई


Comments
Post a Comment