दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाच्या शाखा, परिवर्तनाचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या अकोला जिल्ह्यातील गावा गावात स्थापन करूया
*🔸दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाच्या शाखा, परिवर्तनाचा जिल्हा म्हणून ओळख असणाऱ्या अकोला जिल्ह्यातील गावा गावात स्थापन करूया*
*===============================*
दि 02 ऑक्टोबर 2022 ला *धम्मोदय बुद्धविहार* जानोरी ता बाळापूर जि अकोला येथे वर्षावास भेट परिक्रमा संपन्न.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय अध्यक्ष, *तथागतांनी* दिलेला धम्म आणि *विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी* दाखलेल्या मार्गाचा प्रचार, प्रसार जागतिक पातळीवर गतिमान करणारे *बौद्धांचे* एकमेव तरुण, तडपदार,निर्भीड आणि सडेतोड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या जागतिक धम्म कार्याने प्रभावित आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने व *आयु डॉ अरुण चक्रनारायण सर*, जिल्हा अध्यक्ष अकोला यांना फोनद्वारे संपर्क साधून निरंजन जाधव सर प्रवक्ता जि बुलडाणा यांनी वर्षावास भेट परिक्रमेत,वर्षावास कालावधीत *तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ* जो उपदेश देत असत त्या प्रभावाने समाज नैतिक नितीमुल्याकडे वाटचाल करून दुःखमुक्त होऊन आनंदी जीवन जगत असे.असेच दुःखमुक्त आनंदी जीवन जगून *बाबासाहेबांनी* दाखवलेल्या मार्गाने जाऊन *प्रगतिशील समाज घडवण्यासाठी व भारत बौद्धमय करण्यासाठी* गाव गावात संस्थेच्या शाखा गठीत करून दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाच्या हितासाठी व वाढीसाठी संस्थेचा कार्यकर्ता म्हणून *आद राजरत्न आंबेडकर साहेबांच्या* सोबत काम करून त्यांचे हात बळकट करा असे या प्रसंगी आव्हान केले.
या प्रसंगी परिसरातील *बहुसंख्य धम्मबांधव* उपस्थित होते.
V पावन *प्रतिरुपांचे* पूजन करून सामूहिक *त्रिसरण पंचशील* ग्रहण करण्यात आले.
शेवटी *सरणत्तय गाथेने* कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
*संपर्क:9623237428*
*===============================*
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र
मुख्य संपादक विलास साळवे मुंबई


Comments
Post a Comment