छोट्या छोट्या कार्यक्रमातून धम्म प्रचार आणि प्रसार* *===============================*

*छोट्या छोट्या कार्यक्रमातून धम्म प्रचार आणि प्रसार*
*===============================*
    समाजामध्ये जि काही मोठी मोठी कार्यक्रम होतात जसे की, धम्म परिषद, धम्म मेळावा, धम्म संमेलन ज्या साठी आर्थिक पासून तर सर्व बाबतीत पूर्व तयारी करावी लागते, जमवाजमव करावी लागते,आणि त्या मध्ये  धम्माची शिकवण हजारो धम्मबांधवा पर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवल्या जाते.असे भव्यदिव्य कार्यक्रम काही कालावधी नंतर आयोजित होतात, ते आयोजित करण्यास काही कालावधी द्यावा लागतो.

      परंतु धम्म संस्कृती मध्ये जे विधी संस्कार दिलेले आहेत,त्या छोट्या छोट्या कार्यक्रमामधून सुद्धा  धम्माची शिकवण खारीच्या वाट्या प्रमाणे का होईना धम्म बांधवा पर्यँत पोहचवल्या जात असते.

गावाला लागलेली आग चिमणीच्या चोचितील पाण्याने विझने आवाक्या बाहेर असते, परंतु तिचे नाव आग लावणाऱ्याच्या नाही तर आग विझवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याच्या यादीत येते.

    दि 01 सप्टेंबर 2022 ला सव ता +जि बुलडाणा येथे पुण्यानुमोदन संस्कार विधी पार पडला.

     *स्मृतिशेष भिवाजी सोनाजी पवार* यांचे अल्पशा आजाराने वायाच्या 55 व्या वर्षी दुःखद निधन झाले.

  त्यांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम निरंजन जाधव सर प्रवक्ता दि बुद्धिस्ट सो. ऑफ इंडिया जि बुलडाणा यांनी विधिवत पार पाडला.




      *स्मृतिशेष भिवाजी पवार* यांच्या कार्यकतृत्वावर प्रकाश टाकून धम्म संस्काराचे उदाहरणे देऊन निरंजन जाधव यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

      या प्रसंगी पंचक्रोशीतील धम्मबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

 शाहीर भिवाजी पवार यांनी विधी संचालन केले.

   शेवटी सामूहिक मुक श्रद्धांजली अर्पण करून सरणत्तय गाथे नंतर सर्वांना भोजन देण्यात आले.
*संपर्क:9623237428*
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र मुंबई मुख्य संपादक विलास साळवे

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट