बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ भव्य परिक्रमा व सामापन समारंभ
*🔸बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ भव्य परिक्रमा व सामापन समारंभ🔸*
*===============================*
*अश्विन पौर्णिमेच्या तमाम बौद्ध बांधवांना हार्दिक मंगल कामना!!*
*____________________________________*
दि 09 ऑक्टोबर 2022 ला *तक्षशिला बुद्धविहार लोणी गवळी* ता मेहकर जि बुलडाणा येथे गेल्या तीन महिन्यापासून सुरू असलेला आणि धम्म संस्कृती व विनया नुसार उपासकांना तथागतांचा उपदेश आणि धम्माची शिकवण देऊन विनयशील समाज निर्मिती साठी असलेला वर्षावास गावामधून *भव्य ग्रंथ परिक्रमा करून समापन समारंभ* साजरा करण्यात आला.
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष, तमाम बौद्धांचा बुलंद आवाज, स्वाभिमानी, निर्भीड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी व जि कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने कार्यरत निरंजन जाधव सर,प्रवक्ता जि बुलडाणा यांनी,आपल्या देशाचे पंतप्रधान,U P चे मुख्यमंत्री आणि व्यंकय्या नायडू सारखे माजी उपराष्ट्रपती विदेशात गेले म्हणजे आम्ही भारत म्हणजे बौद्ध राष्ट्रातुन आलेलो आहोत. आम्ही बुद्धिस्ट आहोत असे सांगतात आणि त्या त्या देशातील राष्ट्र प्रमुखांना बुध्द मूर्ती भेट देतात.आणि बुद्धविहारांना भेटी सुद्धा देतात. विदेशातून बुद्धाच्या नावाने निधी प्राप्त करतात.
आम्ही मात्र स्वतः बुध्दिस्ट असून सुद्धा ओळख लपवतो आणि इतर देवी देवतांची व्रत ,वैकल्य,उपासतापास, बोकड कापून नवस साजरे करतो आणि देव्हाऱ्यात आपले *सुटा बुटातील मार्गदाते सॊडून* इतर चार हाताच्या व नंग्या बाबाबुआच्या मुर्त्या नव्या पिढी समोर खरा आदर्श सोडून चुकीचाआदर्श ठेवतो.हा *बाबासाहेबांनी* दाखवलेल्या *मार्गाचा* आणि दिलेल्या *22 प्रतिज्ञाचा* अपमान, आहे पायमल्ली आहे.असे मुख्य मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात आयु शेषराव अंभोरे ता अध्यक्ष, आयु तेजाराव अवसरमोल ता महासचिव मेहकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
*या कार्यक्रमासाठी विविध गावांचे धम्म बांधव प्रचंड प्रमाणात उपस्थित होते.*
*प्रथम आद भंते पटीशन यांनी उपस्थितांना सामूहिक त्रिसरण पंचशील दिले. व धम्म देसना दिली.*
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यागमूर्ती माता रमाई महिला मंडळ व युवा जागृती मंडळ लोणी गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले
*सरणत्तय गाथेने* कार्यक्रम संपन्न झाला व नंतर सामूहिक *भोजन* देण्यात आले.
*संपर्क:9623237428*
*===============================*
शिवनेरी टुडे लाइव महाराष्ट्र मुख्य संपादक विलास साळवे मुंबई


Comments
Post a Comment