दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाची दहा उद्दिष्टे घरा-घरात पोहचवण्यासाठी गाव तेथे शाखा गठीत करा.* - निरंजन जाधव सर.
*दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाची दहा उद्दिष्टे घरा-घरात पोहचवण्यासाठी गाव तेथे शाखा गठीत करा.*
- निरंजन जाधव सर.
*================================*
दि 30 सप्टेंबर 2022 ला *विश्वशांती बुद्धविहार* रोहना ता देउळगाव राजा जि बुलडाणा येथे वर्षावास भेट परिक्रमा संपन्न.
दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष,भारतातील तमाम बौद्धांचे स्वाभिमानी, निर्भीड व एकमेव जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थ वैचारिक वारसदार यांच्या जागतिक धम्म कार्याने प्रभावित, सन्मा. राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने व आयु आर एन घेवंदे जि अध्यक्ष यांच्या गाव तेथे शाखा नुसार निरंजन जाधव सर प्रवक्ता जि बुलडाणा यांनी वर्षावास ठिकाणी मार्गदर्शन करतांना देशातील तमाम महिलांसाठी हिंदू कोडबील सहित समाण काम समान वेतन आणि सहा महिने पगारी प्रसूती रजा हे योगदान केवळ बौद्ध महिलांसाठी नाही तर भारतातील तमाम महिलांसाठी बाबासाहेबांनी दिलेले आहे.याची तमाम भारतीयांनी जाणीव ठेवणे गरजेचे आहे. अश्या मार्गदर्शना सहित संस्थेची दहा उद्दिष्टे घरा - घरात पोहचवण्यासाठी गाव तेथे शाखा गठीत करण्याचे आव्हान करून कार्यकर्ता म्हणून *आद राजरत्न आंबेडकर साहेबांच्या* सोबत काम करण्याचा आग्रह केला.
या कार्यक्रमात आयु हिमतराव जाधव ता अध्यक्ष, आयु रमेश हंबीर शहर अध्यक्ष देऊळगाव राजा यांची उपस्थिती राहून मनोगत व्यक्त केले.
आयु श्रावण खरात ,आयु संतोष कदम, आयु नारायण खरात संस्थेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विषेश परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात परिसरातील धम्मबांधव व इतर धर्मीय लोकं सुद्धा बहुसंख्येने उपस्थित होते.
शेवटी सरणत्तय गाथे नंतर उपस्थितांना खाऊ देण्यात आला.
*संपर्क:9623237428*
*===============================*शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र मुख्यय संपादक विला साळवे मुं ब ई


Comments
Post a Comment