जीवन विकास विद्यालय दुसरबीड येथे गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
जीवन विकास विद्यालय दुसरबीड येथे गणेश उत्सवानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी या कार्यक्रमासाठी शाळा महाविद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक श्री.पी.डी.गायके सर अध्यक्ष म्हणून तर ज्येष्ठ शिक्षक श्री.आर. एम.कुटे सर ,वाघमारे सर तसेच एम.सी.व्ही.सी .विभागाचे श्री. नितीनराव देशमुख सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पहिला गट पाच ते सात मध्ये एकूण सात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या गटाचा विषय होता, प्लास्टिकचा वापर योग्य की अयोग्य तर दुसरा गट 9 ते 12 मध्ये सात विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता या गटाचा विषय होता, शालेय जीवनात मोबाईलचा वापर योग्य की अयोग्य. पाच ते सात या गटामध्ये प्लास्टिकचा उपयोग योग्य आहे या विषयावर सिद्धिविनायक गटाने प्रथम क्रमांक पटकावला,तर माध्यमिक गटामध्ये मोबाईलचा उपयोग योग्य आहे ,या विषयावर सिद्धिविनायक गटाने प्रथम क्रमांक मिळविला
या कार्यक्रमाचे परीक्षण श्री.पी.एस. वाकोडे सर व श्री जी.एस. देशमुख सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.डी.जी. राजे जाधव सर,श्री. एम.बी. पवार सर. श्री.डी.एल.वायल सर.श्री बी.के. देशमुख सर, श्री.अविराजे जाधव सर यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे संचालन श्री. दिलीप काकडे सरांनी केले.या वेळी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र मुख्य संपादक विलास साळवे मुंबई

Comments
Post a Comment