लोकशिक्षण संस्था किनगावराजाच्या शिरपेचात मानाचा तुरा *
लोशिक्षण संस्था किनगावराजाच्या शिरपेचात मानाचा तुरा *जीवन विकास विद्यालय दुसरबीड ,येथील विज्ञान साहित्य राज्यस्तरावर निवड*जीवन विकास विद्यालय, दुसरबिड, ता. सिंदखेडराजा जि. बुलडाणा येथील *शेख आतिक* *शेख समीर* या विद्यार्थ्याच्या *'फोल्डेबल शेड'* या साहित्याची राज्यस्तरावर निवड झाली आहे . या साहित्याचा उपयोग पाण्यापासून शेतामधील अन्नधान्य सुरक्षित ठेवण्यासाठी होतो. शे. आतिक शेख समीर हा शेतकऱ्याचा मुलगा असून शेतामध्ये काय अडचणी असतात हे जाणून ,त्यावर मात करण्यासाठी या विद्यार्थ्याच्या संकल्पनेमधून शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आतिक याने हे साहित्य तयार केले .या साहित्याची निवड शालेय स्तरावर करुन तालुका विज्ञान प्रदर्शनी साठी पाठवण्यात आले होते . तालुकास्तरावर या साहित्याची निवड झाल्यानंतर या साहित्याला जिल्हास्तरावर पाठवण्यात आले होते, जिल्हास्तरावरून या साहित्याची निवड राज्यस्तरावर झाली असून जिल्हास्तरावर या साहित्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या साहित्यासाठी विद्यार्थ्याला
शाळेचे प्राचार्य श्री भांगे सर,वर्गशिक्षक श्री.जि.ओ.देशमुख सर त्याचबरोबर विज्ञान शिक्षक श्री.दिलीप काकडे सर,श्री. एम, बी, पवार सर ,प्रयोगशाळा सहाय्यक श्री. कवाडे सर त्याचबरोबर विज्ञान, एम. सी. व्ही. सी., प्राथमिक, माध्यमिक विभागातील शिक्षक वृंदाचे मार्गदर्शन लाभले आहे. शेख आतिक शेख समीर याचे श्री. प्राचार्य भांगे सरांनी ट्रॉफी देऊन अभिनंदन केले. शाळेतील सर्व शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले. गटशिक्षणाधिकारी श्री. गावडे साहेब त्याचबरोबर माजी गटशिक्षणाधिकारी श्री. आदबने साहेब,तज्ञ शिक्षक श्री.पी .यू गवई सर व विज्ञान शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री.दीपक नागरे सर व पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले व राष्ट्रीय स्तरावर निवड होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.परिसरात त्याचे कौतुक केले जात आहे.
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी दिलीप काकडे मुख्य संपादक विलास साळवे मुंबई शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र

Comments
Post a Comment