छोट्या छोट्या कार्यक्रमातील धम्म प्रचार प्रसार कार्य

*🔸छोट्या छोट्या कार्यक्रमातील धम्म प्रचार प्रसार कार्य🔸*
*==============================*
   दि 15 सप्टेंबर 2022 ला पळसखेड नागो ता + जि बुलडाणा येथे धम्म नियमानुसार,धम्म संस्कृती प्रमाणे विधिवत पुण्यानुमोदन कार्यक्रम संपन्न.

    *स्मृतिशेष लक्ष्मण फकिरा मानकर* यांचे दि 11 सप्टेंबर 2022 ला सकाळी हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानेने  दुःखद निधन झाले,मृत्यू समयी त्यांचे वय 52 वर्षाचे हाते.

     दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया   जिल्हा बुलडाणा प्रवक्ता *निरंजन जाधव  सर* यांनी हा संस्कार विधी विधिवत पार पाडला.

      या प्रसंगी राजर्षी शाहू महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष *सन्मा.संदीप शेळके साहेब* यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करून शाहू परिवारामार्फत स्मृतिशेष लक्ष्मण मानकर शाहू परिवाराचे एक घटक म्हणून *एक लाख तीन हजार रुपये चेक* सानुग्रह सहकार्य केले.मालगणी येथील वंचीत ब आ नेते आयु वाकोडे साहेब यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
     
     निरंजन जाधव सर यांनी श्रद्धांजली अर्पण करतांना *करा विधी आणि कमवा निधी* या पिळवणुकीच्या पडलेल्या चुकीच्या पायंड्याला फाटा देत दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारतातील तमाम बौद्धांचा बुलंद आवाज,स्वभामनी जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या एका सभेतील आदेशानुसार कोणत्याही प्रकारचे धम्मदान न घेता उलटपक्षी दुःखद कुटुंबास 500 रुपये स्वतः पहिले सहकार्य करून उपस्थितांना तसे आव्हान केले आणि सर्व धम्म बांधवांनी सुद्धा अनुकरण करत दुःखी कुटुंबास यथाशक्ती आर्थिक सहकार्य केले.
     
      *आद राजरत्न आंबेडकर साहेबांचा कोणताही कार्यकर्ता धम्म परंपरेतील संस्कार विधी पार पाडन्याचा धम्मदानाच्या नावाखाली निधी घेत नाहीत आणि जो विधिकर्ता  धम्मदान या गोंडस नावाने समाजाची पिळवणूक करत असेल तो दि बुद्धिस्ट सो. ऑफ इंडियाचा म्हणजेच *आद राजरत्न आंबेडकर साहेबांचा* कार्यकर्ता असू शकत नाही. असे मत या प्रसंगी सर्वसामान्य समाज बांधवांच्या हितासाठी निरंजन जाधव सर यांनी आपल्या छोटेखानी मनोगतात व्यक्त केले.
  या दुःखद कार्यक्रमात शाहू परिवारातील सहकारी आणि परिसरातील बहुसंख्य उपासक उपस्थित होते.

बुलढाणा जिल्हाहा प्रतिनिधी समाधान भालेराव जळगाव

    प्रथम पावन प्रतिरुपांचे पूजन करून त्रिसरण पंचशील ग्रहण करून *स्मृतिशेष लक्ष्मण मानकर* यांना सामूहिक मूक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
 शेवटी सरणत्तय गाथा घेऊन उपस्थितांना भोजन देण्यात आले.

*संपर्क:9623237428*
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र 

*====≠=========================*

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट