विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माता आहेत* *- निरंजन जाधव सर

*विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माता आहेत*
   *-  निरंजन जाधव सर.*
*===============================*
    दि 27 सप्टेंबर 2022 ला *साठेगाव* ता सिंदखेड राजा जि बुलडाणा येथे वर्षावास परिक्रमेत धम्म कार्याचा एक भाग म्हणून भेट दिली असता स्मृतिशेष मेजर देवराव झोटे यांच्या चवथ्या स्मृतिदिनी *प्रा. शाळा साठेगाव* मधील गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांचे सुपुत्र शिक्षक आयु अनिल झोटे यांनी *मिक्स शै साहित्य* वितरित करून त्यांना अभिवादन करण्यात केले.




       दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बौद्धांचा स्वाभिमान,निर्भीड जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या जागतिक धम्म कार्याने प्रभावित होऊन आणि सन्मा.राज्य कार्यकरिणी यांच्या प्रेरणेने,आयु आर एन घेवंदे जि अध्यक्ष यांच्या गाव तेथे शाखा वातावरण निर्मितीसाठी *विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी केलेले उतुंग कार्य आणि भारत बौद्धमय करण्यासाठी दहा उद्दिष्टांचा दाखवलेल्या मार्गाची वाटचाल,व त्यासाठी गावोगावी संस्थेच्या शाखा गठीत करून,*आद राजरत्न आंबेडकर साहेबांचा* कार्यकर्ता म्हणून कार्य करण्याचे आव्हान निरंजन जाधव सर,प्रवक्ता जि बुलडाणा यांनी या प्रसंगी केले.

     या परिक्रमेत आयु देविदास उबाळे सर मा मुख्याध्यापक, आयु अनिल झोटे सर,आयु अमोल साळवे सर,आयु खुशालराव झोटे सर मा मुख्याध्यापक यांची विशेष उपस्थिती होती.

   या कार्यक्रमात परिसरातील धम्मबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

    आयु अमोल साळवे सर,यांनी प्रसंगानुरूप मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.

शेवटी सरणत्तय गाथे नंतर उपस्थितांना चहा पान देण्यात आले.
*संपर्क:9623237428*
*===============================*
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट