वर्षावास परिक्रमेत संस्थेच्या दहा उद्दिष्टांवर चर्चा🔸* *===============================*

*🔸वर्षावास परिक्रमेत संस्थेच्या दहा उद्दिष्टांवर चर्चा🔸*
*===============================*
   दि 24 सप्टेंबर 2022 ला *तक्षशिला बुद्धविहार लोणी गवळी* ता मेहकर जि बुलडाणा येथे धम्म प्रचार, प्रसाराचा एक भाग म्हणून वर्षावास परिक्रमेची भेट संपन्न.

    दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष, *विश्वरत्न,बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या* विचाराचे समर्थ वारसदार तमाम बौद्धांचे जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने,आयु आर एन घेवंदे जि अध्यक्ष यांनी केलेल्या आव्हानानुसार गाव तेथे शाखा वातावरण निर्मिती साठी निरंजन जाधव सर प्रवक्ता जि बुलडाणा यांनी वर्षावास परिक्रमा भेटीत उपस्थितांना *धम्मदूत आणि बौधाचार्य* यातील फरक सांगून लावा *विधी आणि कमवा निधी* म्हणजे *धम्मदान* या गोंडस नावाने समाजाची पिळवणूक करणाऱ्या पासून सावध राहण्याचे आव्हान करून *भारत बौद्धमय* करण्यासाठी *विश्वरत्नाने* दिलेल्या मातृसंस्थेच्या दहा  उद्दिष्टांवर चर्चा घडवून ग्राम शाखा गठित करून संस्थेचा कार्यकर्ता म्हणून *आद राजरत्न आंबेडकर साहेबांच्या* सोबत काम करण्याचे आव्हान केले.

      या परिक्रमा भेटीसाठी आयु प्रकाश मोरे विभागीय अध्यक्ष मेहकर, आयु शेषराव अंभोरे ता अध्यक्ष मेहकर,आयु तेजराव अवसरमोल ता महासचिव मेहकर,आयु रवींद्र इंगळे कार्यकर्ता,यांनी विशेष परिश्रम घेतले. 



     वर्षावासामध्ये नेहमीप्रमाणे परिसरातील श्रद्धावान उपासक,उपासिका बहुसंख्येने उपस्थित होते.

     प्रथम सामूहिक त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आले.

    शेवटी *सरणत्तय गाथा* घेऊन उपस्थितांना खोबरा लाडू वितरित करण्यात आला.
*संपर्क:9623237428*
*============================*
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र मुख्य संपादक विलास सापळवे मुंबई

Comments

Popular posts from this blog

कुंबेफळचा सम्राट जनसेवक* — *राजेश इंगळे! *तरुणाईचा झंझावात आता जिल्हा परिषदेच्या दिशेने

किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार संतोषभाऊ वनवे यांची उमेदवारी निश्चित

आज बुलढाणा जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा माननीय गुलाबराव खरात साहेब यांची ग्रेट भेट