माझी माती माझी माणस.*
*माझी माती माझी माणस.*. ठाणे कोर्ट येथे आज दुपारी का कामानिमित्त बुलढाणा येथूनडवोकेट श्री.विनोद पाटील,श्री.सुबोध गिऱ्हे,श्री.संजय उमरकर व त्यांचे मित्र ही
प्रतिष्ठित मंडळी आली होती.त्यांनी वऱ्हाडी मिसळचा बोर्ड पाहिला व आत मध्ये आले आणि
विचारलं की येथील मालक हे विदर्भाचे आहेत का? तेव्हा त्यांना सांगण्यात आले की हो
मालक हे विदर्भातील देऊळगाव राजा येथील आहेत. त्यांनी हॉटेल मधून माझा मोबाईल नंबर
घेतला व मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मी बाहेर असल्यामुळे अर्ध्या तासात आलो
असे त्यांना सांगितले. भेटीदरम्यान त्यांनी माझी आपलुकिने चौकशी केली व माझं भरभरून
कौतुक केलं विदर्भातून एवढ्या लांब येऊन आपण आज 39 शाखा उभ्या केल्या.आणि आपल्या
भागातील कित्येक बेरोजगार तरुणांना रोजगार दिला. आम्हाला आपल्याबद्दल खूप सार्थ
अभिमान आहे.मला आज खूप छान वाटलं कारण माझ्या जिल्ह्यातील माझ्या माणसांनी केलेले
हे कौतुक मला भविष्यात नक्कीच एक ऊर्जा देणारे व प्रोत्साहन देणारे आहे. या प्रसंगी
त्यांना श्री.कैलास गीते लिखित जो जो करील तयाचे हे पुस्तक भेट दिले.

Comments
Post a Comment