विद्यालय,दुसरबीड या ठिकाणी शाळा स्तरावरील विज्ञान
आज दिनांक 29/08/2022 रोजी जीवन विकास विद्यालय,दुसरबीड या ठिकाणी शाळा स्तरावरील विज्ञान प्रदर्शनी पार पडली. या विज्ञान प्रदर्शनी मध्ये इयत्ता 5 ते 8 व इयत्ता 9 ते 12 च्या एकूण 25 विद्यार्थ्यांनी सहभाग
घेतला. या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांची कल्पकता व संशोधन वृत्ती दिसून आली. प्रदर्शनीमध्ये पर्यावरण संतुलन, ऊर्जा, वाहतूक नियंत्रण, स्मार्ट सिटी, तंत्रज्ञान व गृह उपयोगी उपकरणांचा समावेश होता.या प्रदर्शनीचे उद्घाटन श्री.गणेशराव डिघोळे सर व श्री.रंगनाथ गावडे सर केंद्रप्रमुख दुसरबीड यांनी केले. यावेळी प्राचार्य श्री.भांगे सर, श्री. सतीश जाधव सर व श्री. जी. एस. देशमुख सर हे उपस्थित होते. मुलांच्या साहित्याचे मूल्यमापन प्रा. वाघ सर, प्रा.पोटोडे सर, प्रा.रायमल सर, प्रा. जी. आर.देशमुख, प्रा. व्हरसाळे, प्रा.निकम सर, प्रा.धन्नावत सर यांनी केले. वर्ग गट 6 ते 8 यामधून Foldeble hydropower तर वर्ग गट 9 ते 12 या यामधे water- level indicator या साहित्याची निवड मुल्यमापन समितीच्या माध्यमातून करण्यात आली.प्रदर्शनीसाठी विज्ञान शिक्षक श्री. काकडे सर,श्री.पवार सर, श्री जी..ओ.देशमुख सर, श्री.डी जी. राजे जाधव, श्री दहातोंडे सर, कवाडे सर यांनी परिश्रम घेतले. मान्यवरांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.☘️☘️
शिवनेरी टुडे लाईव्ह महाराष्ट्र
मुख्य संपादक विलास साळवे मुंबई

समाधान भालेराव बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
ReplyDelete