गावोगावी दि बुद्धिस्ट सो.ऑफ इंडियाच्या शाखा गठीत करा

*🔸गावोगावी दि बुद्धिस्ट सो.ऑफ इंडियाच्या शाखा गठीत करा🔸*
*==============================*
     *विश्वरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी* स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या घटने मध्ये भारत बौद्धमय करण्यसाठी जि *दहा उद्दिष्टे* दिलेली आहेत ती घरोघरी पोहचवण्यासाठी गावोगावी संस्थेच्या शाखा गठीत करण्याचे आवाहन पुण्यानुमोदन प्रसंगी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करतांना निरंजन जाधव सर,जि प्रवक्ता बुलडाणा यांनी केले.

    दि बुद्धिस्ट सो ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष तमाम बौद्धांचा स्वाभिमान,जागतिक नेतृत्व *आद राजरत्न अशोकराव आंबेडकर साहेब* यांच्या जागतिक धम्म कार्यावर विश्वास ठेवून आणि सन्मा.राज्य कार्यकारीणी यांच्या प्रेरणेने व आयु आर एन घेवंदे साहेब,जि अध्यक्ष यांच्या गाव तेथे शाखा आव्हानानुसार कार्यरत निरंजन जाधव सर यांनी दि 25 सप्टेंबर 2022 ला *विश्वशांती बुद्धविहार* वैशाली नगर सावंगी झोटे ता सिंदखेडराजा जि बुलडाणा येथे पुण्यानुमोदन संस्कार विधी पार  पाडतांना विविध गावावरून आलेल्या बहुसंख्य धम्मबांधवांना *मातृसंस्थेप्रति* असणारी जबादारी आणि धम्म प्रचार, प्रसाराची गरज विषद केली.




   दि 23 सप्टेंबर 2022 ला स्मृतिशेष उत्तमराव शँकरराव झोटे यांचे वृद्धापकाळाने वयाच्या 100 व्या वर्षी दुःखद निधन झाले होते.

       या प्रसंगी आयु प्रा तायडे सर, आयु प्रा गवई सर, जेष्टसाहित्यिक आंबेडकरी विचारवंत आयु कडूबा बनसोडे साहेब, आयु श्रीराम काकडे मा संस्कार प्रमुख जिल्हा बुलडाणा यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले.

     या कार्यक्रमाचे सुत्रांचालन आयु गुलाबराव झोटे मा ASI यांनी केले.

   शेवटी सरणत्तय गाथे नंतर उपस्थितांना सामूहिक भोजन देण्यात आले.
*संपर्क:9623237428*
*===============================*
शिवनेरी टुडे लाइव महाराष्ट्र मुख्य संपादक विलास साळवे मुंबई

Comments